इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जि.प./मनपा/नपा शाळेमध्ये दाखल विद्यार्थ्यांची माहिती |
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत, मुले आत्मविश्वासपूर्वक बोलत आहेत, यापैकी काही शाळांमध्ये प्रभावी स्पोकन इंग्रजीचा वापर करण्यात येत आहे,वाढलेल्या गुणवत्तेमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून पालक मुलांना मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद/मनपा/नपा शाळांमध्ये परत दाखल करत आहेत. या बदलत्या कलाचा (reversal ट्रेन्डचा) मा. मुख्यमंत्री महोदय व मा.मंत्री महोदय यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला. इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून १ किंवा त्यापेक्षा जास्त मुले मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल झाली आहेत अशा शाळांची माहिती या फॉर्ममध्ये भरावी.